Ad will apear here
Next
जगप्रसिद्ध ‘हॅम्लेज’चे रिलायन्सकडून अधिग्रहण
खेळण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश

मुंबई : जगातील सर्वात जुने तब्बल २५९ वर्षांपूर्वी स्थापन झालेला जगप्रसिद्ध खेळण्यांचा ब्रँड ‘हॅम्लेज’ रिलायन्सने विकत घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहाय्यक रिलायन्स ब्रँडसने ‘हॅम्लेज’ची मालकी असलेल्या हाँगकाँग स्थित ‘सी बॅनर इंटरनॅशनल होल्डिंग्ज’मधील शंभर टक्के समभाग खरेदी करण्यासाठी करार केला आहे. यामुळे रिलायन्सचा खेळण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश झाला आहे. तब्बल ८८.५ द्शलक्ष डॉलर्सचा हा व्यवहार आहे.

‘हॅम्लेज’ हे सुमारे २५९ वर्षांपूर्वी १७६० मध्ये ब्रिटनमध्ये स्थापन झालेले जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे खेळण्यांचे दुकान कालांतराने जगप्रसिद्ध कंपनी म्हणून नावारूपाला आले. गेल्या दोन शतकांपेक्षा अधिक काळ,‘हॅम्लेज’ची सर्वोत्कृष्ट खेळणी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहेत. कंपनीने आपल्या रिटेल नेटवर्कचा थिएटर आणि मनोरंजन क्षेत्रातही विस्तार केला आहे.

जगभरात, १८ देशांमध्ये हॅम्लेजची १६७ दालने असून, रिलायन्सकडे भारतातील हॅम्लेजची मास्टर फ्रँचाइजी होती. त्याद्वारे देशभरातील २९ शहरांमध्ये ८८ दालने चालवली जातात. आता या अधिग्रहणामुळे, रिलायन्सला जागतिक पातळीवरील खेळण्यांच्या उद्योगात मोठी भूमिका मिळेल आणि ती मोठी कंपनी म्हणून उदयाला येईल.

या नवीन घडामोडीबद्दल प्रतिक्रिया देताना ‘रिलायन्स ब्रँड’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन मेहता म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून, आम्ही भारतात ‘हॅम्लेज’ ब्रँडखाली किरकोळ खेळणी विक्रीमध्ये दमदार यश साध्य केले आहे. आता जागतिक पातळीवर रिलायन्स या क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी म्हणून आपले स्थान पक्के करेल. हे एक खूप जुने स्वप्न पूर्णत्वास गेले आहे.’ 

हॅम्लेजने १८८१ मध्ये लंडनच्या रीजेंट स्ट्रीटवर त्यांचे फ्लॅगशिप स्टोअर उघडले. हे मुख्य स्टोअर सात मजल्यांवर ५४ हजार चौरस फुट जागेत पसरले असून, येथे पन्नास हजारांहून अधिक खेळणी उपलब्ध आहेत. हे लंडनमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि जगभरातील लोक हे खेळण्यांचे दुकान पाहण्यासाठी आणि येथे खरेदी करण्यासाठी येतात. दर वर्षी ५० लाखांहून अधिक लोक या स्टोअरला भेट देतात.    

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZUGCA
Similar Posts
‘जिओ’ला दोन वर्षे पूर्ण मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ नेटवर्क’ने अत्यंत स्वस्त दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून दिल्यामुळे देशातील मासिक डेटावापर २० कोटी जीबीवरून तब्बल ३७० कोटी जीबीवर पोहोचला आहे. एकट्या जिओचे ग्राहक त्यामधील २४० कोटी जीबी डेटाचा वापर करत आहेत. मोबाइल डेटा वापराबाबत भारत १५५ व्या स्थानावावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे
जेट एअरवेजतर्फे प्रवाशांसाठी विशेष मेजवानी मुंबई : यंदाच्या सणासुदीच्या कालावधीत जेट एअरवेजच्या विमानाने लंडनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोस्ट चिकन व युल लॉग अशी विशेष मेजवानी मिळणार आहे. भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीतर्फे मुंबई व दिल्ली ते लंडन हिथ्रो यादरम्यानच्या निवडक विमानांत ख्रिसमस साजरा केला जाणार आहे
रिलायन्स आता व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात येण्याच्या तयारीत मुंबई : मोफत डेटा, कॉल्स देत रिलायन्स जिओने मोबाईल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात धमाका घडविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सज्ज असल्याची चर्चा आहे. गुगल, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, स्पॉटीफाय आदी व्हिडिओ कंटेंट पुरविणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत रिलायन्स उतरणार आहे.
फॉर्च्युन ‘चेंज दी वर्ल्ड’ यादीत रिलायन्स जिओ प्रथम मुंबई : फॉर्च्युनच्या नव्या ‘चेंज दी वर्ल्ड’ या जागतिक यादीमध्ये रिलायन्स जिओने पहिले, तर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने २३वे स्थान मिळवले आहे. ‘अलिबाबा’सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकून ‘जिओ’ने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत केवळ दोनच भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language